| | | | | |

Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

155209

Home / Initiatives

वारी नारी शक्तीची उपक्रम महिलांसाठी नवे व्यासपीठ : मुख्यमंत्री


पंढरपूर : वारी नारी शक्तीची उपक्रमाने महिला योजनांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी नवे व्यासपीठ मिळाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारी नारीशक्तीची या उपक्रमाच्या सांगता समारोहात केले.

राज्य महिला आयोगाच्यावतीने यंदाच्या आषाढी वारीत संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर वारी नारीशक्तीची उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा समारोप पंढरपूर येथील शासकीय विश्रमगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमास सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व महिला आयोगाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, 'महिला आयोगाने आषाढी वारीमध्ये वारी नारीशक्ती अभिनव संकल्पना राबवून महिलांविषयीच्या योजनांच्या प्रसिद्धीस नवे दालन उपलब्ध केले. महाराष्ट्रात आषाढी वारीला सातशे वर्षाची परंपरा आहे व इतिहास आहे. वारी सज्जन शक्तीचा आविष्कार असून या शक्तीचा वापर महिलांच्या सक्षमीकरणासठी महिला आयोगाने या उपक्रमाच्या माध्यमातून केला आहे. वारी नारीशक्तीची या उपक्रमातून महिलांसाठी असणारे कायदे, आरोग्य योजना व त्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहचविण्यास मदत झाली.'

श्रीमती विजया रहाटकर म्हणाल्या, 'राज्य शासन महिला केंद्री अनेक योजना राबवित आहे. शासकीय योजनांची माहिती महिलांना व्हावी यासाठी महिला आयोगाने वारी नारीशक्तीची उपक्रम राबविला. वारीमध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून योजनांचा प्रचार व प्रसार केला. वारी नारी शक्तीच्या उपक्रमात महिलांची काळजी घेण्याचे काम केले असून या कालावधीत सुमारे चार ते साडेचार लाख महिलांशी संवाद साधण्यात आला. माझी कन्या भाग्यश्री, अस्मिता सारख्या योजनांची माहिती महिलांना देऊन रोज प्रबोधनात्मक चित्रपट दाखविण्यात आले. कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आषाढी वारी निमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशाची चित्रफीत दाखविण्यात आली.


u-1
u-2
u-3

u-1
u-1
u-1

u-1
u-1
u-1