मुख्यपृष्ठ / पुढाकार
महिला व बालकांसाठी असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी, त्यांचे विविध प्रश्न या अनुषंगाने अमरावती जिल्ह्याची आढावा बैठक आज जिल्ह्याधिकारी कार्यालयात झाली. पोलीस, प्रशासन, शिक्षण, कामगार, परिवहन, आरोग्य अशा विभागांचा आढावा घेतला.
अमरावती मध्ये बालविवाह रोखल्याची कागदावरील आकडेवारी फार कमी आहे. प्रत्यक्षात जे रोखले त्या पेक्षा अधिक बालविवाह होत असतात. तेव्हा त्या दृष्टीने ठोस प्रयत्न करणे गरजेचे आहे. वन स्टॉप सेंटर, महिलांना अडचणीत असल्यास कुठे व काय मदत मिळू शकते या सगळ्या यंत्रणेची जनजागृती व्हायला हवी. जिल्ह्याला स्वतंत्र स्वाधार गृह नाही याबाबत आयोग ही शासनाला पाठपुरावा करेल. शुभ मंगल विवाह योजना माहिती निरंक आहे तेव्हा त्याबाबत जनजागृती करावी अशा सूचना यावेळी दिल्या.
अमरावती पोलिसांनी बेपत्ता झालेल्या काही महिलांच्या प्रकरणात यशस्वी तपास करत राजस्थानमधून त्यांना परत आणले. पोलिस दीदी उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवला जात आहे. चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृतीचे पोलिसांचे प्रयत्न चांगले आहेत अशा चांगल्या कामासाठी उपस्थित पोलिसांचे अभिनंदन केले.