मुख्यपृष्ठ / पुढाकार
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून जिल्हास्तरावर जात जनसुनावणी घेतली जाते. 'महिला आयोग आपल्या दारी' अंतर्गत आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात सुनावणी झाली.
यावेळी आमदार सुलभाताई खोडके, सदस्या आभा पांडे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, मनपा आयुक्त देविदास पवार, जि.प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, महिला व बालविकास विभागीय उपायुक्त विलास मरसाळे, झोन १ चे पोलीस उपायुक्त डॉ सागर पाटील, झोन २ चे पोलीस उपायुक्त विक्रम साळी, सचिव विधीसेवा प्राधिकरण जी. आर. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कैलाश खोडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उमेश टेकाळे, RDC अमरावती रंजीत भोसले उपस्थित होते.
अमरावतीमध्ये आज एकूण 95 तक्रारी सुनावणी करता आल्या. यातील तब्बल 71 तक्रारी या कौटुंबिक त्रास, छळ अशा होत्या.