मुख्यपृष्ठ / पुढाकार
या समारोहाला महाराष्ट्राचे गृहमंत्री मा.ना.दिलीप वळसे पाटील हे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून लाभले होते. तसेच महिला व बालविकास मंञी श्रीमती यशोमती ठाकुर , महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा अॕड.श्रीमती निर्मला सामंत प्रभावळकर, विधान परिषदेच्या सदस्या प्रा.डॉ.श्रीमती मनीषा कायंदे यांची देखील उपस्थिती होती.महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने येत्या वर्षात घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा यावेळी घेण्यात आला. यामध्ये आयोगाच्या वतीने आगामी वर्षात सार्वजनिक ठिकाणी होणारे महिलांवर अत्याचार आणि समस्या , घरघुती हिंसाचार , कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक अत्याचार , बालविवाहामुळे उद्भवणाऱ्या समस्या , महिला नेतृत्व विकसन या आणि अशा विविध विषयांवर उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. आदिशक्ती अभियानाचा एक भाग म्हणून यावेळी महिलांची सुरक्षा : काल , आज आणि उद्या या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.