| | | | | |

आमचा संपर्क क्रमांक

(०२२) २६५९२७०७

आमचा हेल्पलाइन क्रमांक

१५५२०९

मुख्यपृष्ठ / पुढाकार

Public hearing Latur


लातूर जिल्हा दौऱ्यावर आज 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमाअंतर्गत जन सुनावणी घेतली. जिल्हाधिकार्यालयात झालेल्या या सुनावणीवेळी माझ्यासह आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील यादव, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी देवदत्त गिरी, महिला आयोगाचे कोऑर्डिनेटर गंगापुरे आधी उपस्थित होते. आज एकूण 93 तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली. तीन पॅनलच्या माध्यमातून एकाच वेळी या सर्व तक्रारी निकाली काढण्याचा प्रयत्न केला. मुलगी बेपत्ता झाली तरी पोलीस दखल घेत नाहीत, महानगरपालिका हद्दीत बस स्टॉप आहे पण सिटी बस थांबत नाहीत, कोर्टाचे आदेश येऊनही पोटगी मिळत नाही, सात - बारावरचे नाव फसवणूक करून घरच्यांनीच हटवले, कोविडमध्ये पतीचे निधन झाल्यानंतर शासनाची मदत मिळाली नाही अशा विविध प्रकारच्या तक्रारी समोर आल्या. जिल्हाधिकारी, पोलीस, विधी व सेवा प्राधिकरण अशा संबंधित यंत्रणांकडे त्या सोपवून आज माझ्यापर्यंत आलेल्या प्रत्येक महिलेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

u-1
u-1
u-1

u-1