मुख्यपृष्ठ / पुढाकार
विदर्भ दौऱ्यावर असताना अमरावती, वाशिम, अकोला नंतर दिनांक १३ ऑक्टोबर रोजी , बुलडाणा जिल्हयात 'महिला आयोग आपल्या दारी' जनसुनावणी आयोजित करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या सुनावणीस माझ्यासह आयोगाच्या सदस्या आभा पांडे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, पोलीस अधिक्षक सुनील कडासने, महिला व बालकल्याण उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अमोल डिधुळे, माविम समन्वयक सुमेध तायडे, विधी सेवा प्राधिकरणाच्या ॲड. किरण राठोड उपस्थित होते.
बुलडण्यात तीन पॅनलच्या माध्यमातून आज १६५ केसेस वर तक्रारीवर कारवाई करण्यात आली. यात सर्वाधिक ११३ प्रकरणे ही कौटुंबिक किंवा वैवाहिक त्रासाची होती.