मुख्यपृष्ठ / पुढाकार
महाराष्ट्र राज्य महिला आय़ोगाचा ३२ वा वर्धापन दिन शुक्रवार दि. २४ जानेवारी २०२५ रोजी आयोग कार्यालयाच्या सभागृहात आयोगाच्या सदस्या अँड गौरी छाब्रिया, सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती वर्षा लड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विविध समाजसेवी संस्थांचे प्रतिनीधी, महाविद्यालयाचे विद्यार्थी, म्हाडा, माविम कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आयोगाच्या २०२५ च्या दैनंदिनी व दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
भारताने राज्यघटना स्विकारलेल्याला ७५ वर्ष झाल्याने देशभरात ‘हमारा संविधान, हमारा स्वाभिमान’ अभियान राबविण्यात येत आहे. आयोगाचा वर्धापन दिन आणि प्रजासत्ताक दिन या औचित्याने संविधानाने महिलांना काय दिले या विषयावर व्य़ाख्यान आय़ोजित करण्यात आले होते.