| | | | | |

आमचा संपर्क क्रमांक

(०२२) २६५९२७०७

आमचा हेल्पलाइन क्रमांक

१५५२०९

मुख्यपृष्ठ / पुढाकार

रत्नागिरी - महिला आयोग आपल्या दारी


महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमांतर्गत कोकण विभागाचा दौरा सुरू असताना आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत मंगळवार, दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी रत्नागिरी जिल्ह्याची जनसुनावणी तहसीलदार कार्यालय सभागृहात घेण्यात आली.

अध्यक्ष श्रीमती चाकणकर यांच्या सह जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, आयोगाच्या सदस्य सचिव माया पाटोळे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव माणिकराव सातव, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्रीकांत हवाले यावेळी उपस्थित होते.

या जनसुनावणीत १३८ तक्रारी वर कार्यवाही करत महिलांना न्याय, दिलासा देण्यात आला. कौटुंबिक त्रासाच्या नितक्रारींसह मालमत्ता, कामाच्या ठिकाणी छळ अशा तक्रारी समोर आल्या. दिव्यांग महिलांचे आधार कार्ड मिळण्यात अडचण, सरपंचाकडून मानसिक त्रास, आर्थिक फसवणूक अशा स्वरूपाच्या तक्रारी होत्या. प्रशासनाशी सबंधित तक्रारींवर जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी जागीच तातडीने कार्यवाही केली.

जनसुनावणी नंतर जिल्ह्यातील महिला बालकांच्या योजनांची अंमलबजावणी दृष्टीने आढावा बैठक झाली. यावेळी प्रशासन, पोलीस, कामगार, आरोग्य, शिक्षण, परिवहन अशा विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यानंतर माध्यमांशी बोलताना श्रीमती चाकणकर म्हणाल्या, भौगोलिक दृष्ट्या मोठा जिल्हा असल्याने अडचणीच्या काळात महिलांना मदत मिळावी यासाठी अजून एक सखी वन स्टॉप सेंटर असावे यासाठी जिल्हाधिकारी यांनी सांगण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक दशके मुलींचा जन्मदर चांगला आहे. पुरुषांपेक्षा महिला लोकसंख्या, मतदार संख्या जास्त आहे हे खूपच प्रेरणादायी चित्र आहे. पोलीस बेपत्ता महिलांचा तपास योग्यरित्या करत असून दामिनी पथकाला QR कोडचा वापर हे स्तुत्य उपक्रम आहेत.

u-1
u-1
u-1
u-1