Home / Initiatives
राज्यातल्या जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि महिला बाल कल्याण अधिकारी यांची आज आयोगाच्या मुंबईतील मुख्यालयात बैठक घेतली. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, सदस्या गयाताई कराड, विंदा कीर्तिकर, आशा लांडगे आणि सदस्य सचिव डाॅ. मंजुषा मोळावणे उपस्थित होत्या. जिप अधिकारयांबरोबरील बैठकीचा मुख्य विषय होता राज्यभरातील समुपदेश केंद्रांचा आढावा घेण्याचा. निधीअभावी व अधिकारयांच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागातील केंद्रांची होत असलेल्या हेळसांडीची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. सेस फंडातून समुपदेशन केंद्रांना निधी दिला पाहिजे, असे अध्यक्षा रहाटकर यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर समुपदेशन केंद्रांसाठी नव्या निकषांबद्दलही चर्चा झाली.