| | | | | |

आमचा संपर्क क्रमांक

(०२२) २६५९२७०७

आमचा हेल्पलाइन क्रमांक

१५५२०९

Home / Initiatives

2 DAYS CONFERENCE HAS BEEN ORGANISED BY STATE WOMEN'S COMMISSION FOR THE SAFETY OF WOMEN IN THE SUICIDAL FARMER'S FAMILY.


मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि महिला किसान अधिकार मंच (मकाम) या स्वयंसेवी संस्थेने उद्यापासून (सोमवार, दि. 26) दोन दिवसांची परिषद आयोजित केली आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकरी महिलांची लक्षणीय उपस्थिती हे या परिषदेचे मुख्य वैशिष्ट्य असेल.


विभागीय आयुक्तालयाच्या सहकार्याने ही परिषद होत असून उद्या (सोमवार) तिचे उदघाटन महाराष्ट्र महिला आयोगा


च्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते होईल. त्यावेळी विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांची मुख्य उपस्थिती असेल. या दोन दिवसांच्या परिषदेमध्ये आत्महत्यांबाबतचे निकष, घर आणि शेतीची वारस नोंद कुटुंबातील महिलेच्या नावाने होणे, कर्जांची उपलब्धता, त्यांच्यासाठी उपजीविकेची साधने, सरकारच्या योजना, शेतकरी


महिलांचे आरोग्य व मानसिक संतुलन आदी विविधांगी मुद्द्यांवर परिषदेत


चर्चा होणार आहे. बीड, उस्मानाबादच्या जिल्हाधिकारयांसह महसूल व कृषि
यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीसुद्धा या
परिषदेत सहभागी होणार आहेत. आयोगाने यापूर्वीच अशीच परिषद विदर्भातील
शेतकरी महिलांसाठी नागपूरमध्ये आयोजित केली होती.तसेच मागील आठवड्यात
औरंगाबादमध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांच्या प्रश्नांबाबत तलाठ्यांमध्ये जागृती करण्यासाठी कार्यशाळा घेतली होती. आता त्यापाठोपाठ मराठवाड्यातील शेतकरी महिलांच्या प्रश्नांचा वेध घेण्याचा आयोगाचा
प्रयत्न आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकने कर्जमाफी, खत पुरवठा,
जलयुक्तशिवार सारख्या क्रांतिकारी योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याची
केलेली सोय, वर्षानुवर्षे रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावण्याचा आटोकाट
प्रयत्न या पद्धतीने कृषिसंकटांवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विविध योजनाही राबविल्या जात आहेत. तरीदेखील मराठवाड्यात २०१६ मध्ये १०२४ शेतकरयांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यानंतर त्या कुटुंबातील महिलांची अवस्था अतिशय शोचनीय होते. त्यांच्या हालअपेष्ठांकडे क्वचितच लक्ष दिले जाते. माहितीच्या अभावी त्यांना घर, जमिनीची मालकी मिळत नाही, बँका कर्ज देत नाहीत, उपजीविकेसाठी आवश्यक कौशल्ये बहुतेकवेळा नसतात, सरकारी योजनांच्या निकषांत बसत नाहीत किंवा अनेकवेळा त्या योजनांची माहितीसुद्धा नसते. हे सगळे लक्षात घेऊन आयोगाने आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांच्या प्रश्नांबाबत जनजागृती करण्यासाठी या परिषदेचे आयोजन केल्याची माहिती विजया रहाटकर यांनी दिली. त्यासाठी 'मकाम' या स्वयंसेवी संस्थांच्या जाळ्याचे उत्तम सहकार्य मिळत
असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचार, कामांच्या ठिकाणी लैंगिक शोषण यासारख्या महिलांच्या अनेक मुद्द्यांवर आयोग सध्या काम करीत आहेत. संकटग्रस्त महिलांसाठी आयोगाने नुकतीच 'सुहिता' ही समुपदेशनासाठी हेल्पलाइन सुरू केलेली आहे. या उपक्रमांबरोबरच आयोगाने आता आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकरी महिलांच्या प्रश्नांकडे समाजाचे,
सरकारचे लक्ष वेधण्यास सुरूवात केली आहे.
जरूर या...


u-2
u-2