Home / Initiatives
बृहन्मुंबई महानगरपालिका सावित्रीबाई बाई फुले स्त्री संसाधन केंद्रच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुंबई महानगर पालिकेच्या विविध कार्यालयातील कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध कार्यकारी समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट काम केलेल्या महापालिकेच्या महिला तसेच पुरूष कर्मचाऱ्यांनाही सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले.
मुंबई महानगर पालिकेच्या सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राचे काम कौतुकास्पद असून भविष्यात त्यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य महिला आयोग राज्यातील सर्व महापालिकात याविषयी काम करेल.