Home / Initiatives
मराठवाड्यातील असंघटित क्षेत्रातील महिलांच्या प्रश्नांबाबत सोमवारी औरंगाबादमध्ये अभ्यासपूर्ण चर्चासत्र झाले. 'स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा इन्स्टिट्यूट आॅफ सोशियो- इकाॅनाॅमिक रिसर्च अँड नॅशनल इंटिग्रेशन' या संस्थेबरोबर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने हे चर्चासत्र आयोजित केले होते. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी त्याचे उदघाटन केले.