| | | | | |

आमचा संपर्क क्रमांक

(०२२) २६५९२७०७

आमचा हेल्पलाइन क्रमांक

१५५२०९

Home / Initiatives

TWO DAYS SEMINAR ON "THE SAFETY OF SUICIDES FARMER WIDOW WOMAN'S FAMILIES IN VIDARBHA".


'मकाम' ही स्वयंसेवी संस्था आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने बुधवारी नागपूरमध्ये विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला शेतकरयांच्या सुरक्षिततेविषयावरील चर्चासत्र झाले. आयोगाच्या अध्यक्षा मा. विजया रहाटकर यांनी त्याचे उदघाटन केले. त्यावेळी त्यांच्यासोबत नागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमार, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, शेतकरी संघटनेचे विजय जावंधिया, 'मकाम'च्या सीमा कुलकर्णी, 'प्रकृती' या संस्थेच्या सचिव शोभा साखरवाडे आणि सुवर्णा दामले आदी उदघाटन सत्राला उपस्थित होते.


आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आत्महत्या केलेल्या शेतकरयांच्या विधवांवर येणारया संकटांचा वेध घेतला. गेल्या दोन दशकांत देशात तीन लाखांहून अधिक शेतकरयांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या मृत्यूपश्चात डोक्यावरील कर्ज फेडण्याची, घर चालविण्याची, मुलाबाळांचे शिक्षण करण्याची सर्व जबाबदारी त्या शेतकरयाच्या विधवेवर येते. बहुतेकवेळा संबंधित शेतजमीन त्या विधवेच्या नावाने करून देण्यास कुटुंबातील अन्य नातेवाईक विरोध करतात. त्रास देतात. आत्महत्येप्रकरणी राज्य सरकारकडून मिळालेल्या नुकसानभरपाईदेखील पूर्णपणे त्या विधवेला मिळत नाही, असे त्या म्हणाल्या. शेतकरयांच्या विधवांवर कोसळणारया या संकटांवर मात करण्यासाठी विजया रहाटकर यांनी अनेक उपाययोजना सुचविल्या. विधवा व तिच्या मुलांच्या नावाने शेतजमिनीची वाटणी व्हावी, सरकारी योजना व नोकरयांमध्ये या विधवा व त्यांच्या मुलांना प्राधान्य द्यावे, संजय गांधी निराधार योजना अधिक सक्षम करावी अशा त्या सूचना होत्या. यावेळी त्यांनी विधवांनी समाजाशी संघर्ष करीत मिळविलेल्या काही यशकथांचाही आवर्जून उल्लेख केला.


हे चर्चासत्र दोन दिवस चालेल. त्यामध्ये शेतीवरील हक्क, बँकेच्या कर्जांसंबंधी प्रश्न, आरोग्य उपजीविका, सरकारी योजनांचा लाभ अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल.


u-2
u-2
u-2

u-2
u-2
u-2

u-2
u-2
u-2