Home / Initiatives
दिनांक 24 -25 फेब्रुवारी 2018 रोजी युवती युवकांसाठी विवाहपूर्व मार्दगर्शन व कायदेविषयक माहिती या विषयांवर 2 दिवसीय निवासी कार्यशाळा स्त्री मुक्ती संघटना व महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. सदर कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्याकडून स्त्री मुक्ती संघटनेला अनुदान देण्यात आले होते. स्त्री मुक्ती संघटनेतर्फे स्त्री पुरूष समानता हा संदेश समाजात रूजावा आणि लग्नसंबंधातील नातीही परस्पर पूरक निर्माण व्हावीत आणि कौटुंबिक हिंसा थांबावी या उद्देशाने युवक युवतींसाठी विवाहपूर्व मार्दगर्शन ही मोहिम राबवली जाते. महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या मदतीचे औचित्य साधून संघटनेच्या कोपरखैरणे केंद्रामधे वस्तीत राहणाऱ्या युवती युवकांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली.
सदर कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य मा विंदा किर्तिकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपलब्ध संधीचा युवकांनीयोग्य वेळी उपयोग केला पाहिजे असे सांगताना त्यानी अत्यंत बोलकी उदाहरणे सांगितली. तसेच महिला आयोगाच्या कार्यपध्दतीबद्दल माहिती सांगितली. तसेच संघटनेच्या अध्यक्ष ज्योति म्हापसेकर तसेच कार्यकर्त्या वृषाली मगदूम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेत खालील विषयांवर युवकांना मार्गदर्शन करण्यात आले. समानतेच्या वाटेवर ,विवाहातील जोडीदार निवड, विवाहातील समायोजन,लैंगिकता शिक्षण, विविध कायदेविषयक माहिती, कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा,P C P N D T कायदा,पोक्सो कायदा ताणतणाव नियोजन,सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षा,स्वपरिचय-स्वप्रतिमा,व्
सदर कार्यशाळेत 50 च्यावर युवक युवतींनी सहभाग घेतला. प्रत्येक विषयावर त्यानी मोकळेपणाने प्रश्न विचारले साधन व्यक्तींनी शंकांचे निरसन केले.