Home / Initiatives
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे निमित्त साधून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने आज (८ मार्च २०१८) दोन पुस्तके प्रकाशित केलीत. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याहस्ते त्यांचे प्रकाशन झालं.
पहिले पुस्तक म्हणजे 'साद दे, साथ घे' हे पुस्तक. आयोग कशापद्धतीने काम करते, संकटग्रस्त महिलांना मदत आणि मागदर्शन कसे करते, याची सुंदर शब्दांमध्ये आणि कथा स्वरूपात लिहिलेले हे पुस्तक. वरिष्ठ पत्रकार धनंजय बिजले यांनी त्यासाठी लेखन सहाय केलंय. ज्यांना आयोगाचे कामकाज माहित करून घ्यायचंय, त्यांनी जरूर वाचावंस असं पुस्तक.
दुसरया पुस्तकाचे नाव आहे 'प्रवास सक्षमते'कडे. हे पुस्तक नव्हे तर मार्गदर्शक पुस्तिका आहे समुपदेशकांसाठी. महिलांना आधार देण्यात, मदत करण्यात आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकांची भूमिका फार मोलाची असते. पण बहुतेकवेळा समुपदेशकांनाच पुुरेसे मार्गदर्शन मिळत नसते. ती उणीव ओळखून तयार केलेली ही पुस्तिका कम मार्गदर्शिका. पुण्यातील नामवंत शिक्षण संस्था 'आयएलएस लाॅ काॅलेज'मधील स्त्री अभ्यास केंद्राच्या सक्रिय सहकार्यातून ही पुस्तिका तयार झालीय. अभ्यासपूर्ण दस्तऐवज आहे हा.