Home / Initiatives
हलाला, बहुपत्नीत्व अशा कुप्रथांविरोधात मुस्लिम महिलांनी लढा उभारावा : विजया रहाटकर
तिहेरी तलाक विरोधात लढा उभारलेल्या महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने साथ दिली आहेच आता
हलाला, बहुपत्नीत्व अशा कुप्रथांविरोधात मुस्लिम महिलांनी लढा उभारावा असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि भारतीय मुस्लिम महिला आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'तीन तलाक बिल - चर्चा और सुझाव' या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
तिहेरी तलाकबाबतच्या मसुद्याबाबत चर्चा आणि सूचना याबाबत यावेळी चर्चा झाली. तिहेरी तलाक सोबतच हलाला, बहुपत्नीत्व, मेहेर अशा अडचणीना सामोरे जाणाऱ्या महाराष्ट्रसह गुजरात मधील महिलांनी आपल्या व्यथा यावेळी मांडल्या.
तिहेरी तलाक विरोधात मोठा लढा मुस्लिम महिलांनी उभारला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मुस्लिम महिलांच्या घटनात्मक अधिकारांचा विजय झाला. न्यू इंडिया साकारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार याबाबत कायदा करत आहेच आता याबरोबरच एन आर आय पती कडून होणारी फसवणूक थांबविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग अशा वेगवेगळ्या विषयांवर केंद्र आणि राज्य सरकारला शिफारस करत आहे असे विजया रहाटकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
तिहेरी तलाक कायद्यात अशा तलाकना पाठिंबा देणाऱ्या काझीना ही शिक्षा करण्याची तरतूद व्हायला व्हावी असे यावेळी भारतीय मुस्लिम महिला आंदोलनच्या संस्थापक नूरजहाँ यांनी सांगितले.
यावेळी निर्मला सामंत प्रभावळकर, माजी सनदी अधिकारी टी थेकेकरा, भारतीय मुस्लिम महिला आंदोलनच्या संस्थापक तसेच विविध जिल्ह्यातील महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.