Home / Initiatives
8 व 9 मे 2017 रोजी पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोग,राष्ट्रीय महिला आयोग आणि महिला किसान अधिकार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या पश्चिम क्षेत्रातील म्हणजेच महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यातील महिला शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यावरील उपाय,नियोजन आणि त्यांच्या अंमलबजावणी संबंधी धोरण याबद्दल चर्चा करण्यासाठी एका विशेष "रिजनल कॅन्सल्टंटेशन" चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मी सहकार पद्धतीने शेती व त्याचे फायदे, शेती सोबतच त्याला पूरक अश्या काही कुटीर व लघु व्यवसाय याबद्दल माहिती आणि सर्वांसाठी असलेल्या सरकारी योजना आणि अनुदान याबद्दल उपस्थित महिलांना माहीती दिली. चारही राज्यातून अनेक महिला शेतकरी उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाल्या. सोबत तिन्ही संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.