Home / Initiatives
मुंबई येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने राज्यातील पाळणाघर व बाल संगोपन केंद्रे यांच्यासाठी एक विशेष मार्गदर्शक सूचना व गाईडलाईन्स बनवली आहे. CM Devendraji यांना सादर करताना. खारघर येथे घडलेल्या दुर्देवी घटनेची गंभीर दखल घेत आयोगाने ही गाईडलाईन्स बनवली आहेत. यामुळे राज्यातील सर्व पाळणाघर आणि तत्सम सेवा क्षेत्रात असलेल्या सर्व संस्थांचे नियमन करणे सुलभ होईल,त्यांना या संबंधीचे नियम, नोंदणी,व्यवस्थापन आणि प्रशिक्षण या बद्दल माहिती मिळेल तसेच मुख्य म्हणजे मुलांबाबत होणारे गैरवर्तन व निष्काळजी रोखण्यात यश मिळेल तसेच मुले व पालक आनंदी राहू शकतील.