मुख्यपृष्ठ / पुढाकार
मुंबई दि. ०८ – संधी, प्रोत्साहन दिल्यास महिला नेतृत्व आणि कर्तुत्व सिद्ध करतातच अशी भावना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोजित ‘जागर स्त्रीत्वाचा, सन्मान कर्तुत्वाचा’ सन्मान सोहळ्यात व्यक्त केली. अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या भाषणात विधवा हा शब्द महिलेचे मनोबल खच्ची करणारा असून शासनाने पर्यायी असा ‘पुर्णांगी’ शब्द स्विकारावा असे सांगितले.
जाeगतिक महिला दिनाचे औचित्य साधत राज्य महिला आय़ोगाकडून ‘जागर स्त्रीत्वाचा, सन्मान कर्तुत्वाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर, वांद्रे पश्चिम येथे करण्यात आले होते. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, निवृत्त न्यायमुर्ती साधना जाधव, आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता हरीश पाठक, विशेष पोलिस महासंचालक दिपक पांडे, आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते, अँड संगीता चव्हाण, आभा पांडे, दिपीका चव्हाण, सदस्य सचिव श्रद्धा जोशी, दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुख शीला साईल यावेळी आदी मान्यवर उपस्थित होते. विधान परिषदेच्या उपसभापती डाँ नीलम गोर्हे दुरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या.